भाषणांची पन्नास वर्षे!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…

पुढे वाचा