नमस्कार! ‘चपराक’च्या माध्यमातून आपण आजवर अनेक प्रयोग केले आहेत. एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक आणि उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर आपले काम सर्वदूर पोहोचले आहे. नवनवीन पुस्तकांची वाढती मागणी आणि ‘चपराक’ साप्ताहिक, मासिकाचे वाढतच जाणारे सभासद यामुळे अनेक वाचक जोडले जातात. त्यांना ‘चपराक’सह अन्य प्रकाशकांच्या लेखकांची पुस्तकेही हवी असतात. त्यांच्याकडून सातत्याने तशी मागणी येत असते. आपली स्वतंत्र वितरण व्यवस्था असल्याने इतर प्रकाशकांची पुस्तके आपल्याकडे विक्रीला नव्हती! मात्र वाचकांना हवी ती दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत, अन्य प्रकाशकांना विक्रीसाठी हातभार लावावा आणि अत्यंत सचोटीने ग्रंथ व्यवहारही जपावा…
पुढे वाचा