नवीन

वर्डस्वर्थ, यिट्स, शेक्सपिअर आणि मी

एकेकाळी वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स… या दिग्गजांच्या शब्दांनी मी भारावलो होतो. त्यांच्या कवितांनी मी आणि माझी कविता अक्षरश: वेडावलो होतो. त्यांच्या इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बाह्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला. साहित्य वाचण्याची गोडी माझ्यात मातृभाषेमुळंच निर्माण झाली खरी पण साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्यानं माझ्यावर गारूड केलं…

पुढे वाचा

कौसल

फाटकावर थांबूनच त्याने हवेली डोळाभर न्याहाळली. मोठ्या झाडाची पानगळ झाली तरी त्याचा भक्कमपणा गळत नसतो असंच काहीसं वाटलं त्याला. हवेलीचं जुनं वैभव जरी खंगलं होतं तरी तिची ऐट काही कमी झाली नव्हती. श्रीमंती उपभोगलेल्या किंचित प्रौढ बाईसारखी वाटत होती ती. ‘‘कलेक्टर साहेबानं पाठवलं का तुम्हाला?’’ कुणीतरी त्याला बोललं म्हणून तो भानावर आला. त्यानं त्यांच्याकडं बघितलं. एक म्हातारा माणूस, अरे हे तर दामूअण्णा! ‘‘हो.’’ ‘‘या साहेब, या’’ असं म्हणत दामुने त्याची बॅग घेतली अन् वाड्याकडे चालू लागला. तोही त्याच्या पाठोपाठ चालू लागला. ‘‘किती दिवस थांबावे लागेल?’’ ‘‘दोन-चार दिवसात होतील सगळे व्यवहार.’’

पुढे वाचा

धडपडीचे… न मावळलेले दिवस!

‘लॉकडाऊन’च्या काळात वाचनालयं बंद असली तरी घरात पुस्तकांचा खजिना अन् हाताशी भरपूर वेळ होता. पूर्वी वेगवेगळ्या वेळी वाचलेली पुस्तकं, आता सलगपणे वाचताना प्रतिभावंत लेखक-कलाकारांच्या आठवणींचे कितीतरी उभे-आडवे समान धागे मिळत गेले. ते सारे काळाच्या समान सूत्रात गुंफताना झालेल्या वस्त्रांची ही गोधडी.

पुढे वाचा

हे देवाघरचे देणे!

प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय?

पुढे वाचा

‘परदेशस्थ’ मुलीचं पत्र

हाय आई अणि बाबा, कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं! आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील आणि तुम्ही त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची , गाण्याचे कार्यक्रगेट टुगेदर्स, जिम वगैरे मध्ये बिझी व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, ऍक्टिव्हिटीज मध्ये. तसे आपण आठवड्यातून एकदा…

पुढे वाचा

लेखणीच्या बळावर आर्थिक झेप कशी उंचावणार?

महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीहून अधिक आहे. जगभरात दहा कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या दहा भाषांत मराठी आहे. मराठी भाषेचा इतिहास हा हजार ते बारा वर्षांचा आहे, अशा गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो! मात्र केवळ साहित्यनिर्मितीला ‘व्यवसाय’ मानून जगता येईल अशी आजही परिस्थिती नाही. गेल्या दीडशे वर्षात ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यनिर्मिती केली त्या सर्वांनी आपला चरितार्थासाठीचा व्यवसाय वेगळा ठेवलाय आणि त्यांचं लेखन त्यांचा छंद म्हणून जोपासला आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः आधुनिक गद्य लेखनाला सुरूवात झाल्यानंतर ते आजअखेर केवळ साहित्यावर उपजिविका चालविणारे अत्यंत अल्प लेखक होऊन गेले.…

पुढे वाचा

एकमेवाद्वितीय

मराठी माणूस जागतिक स्तरावर जाऊ शकतो, हे ज्या थोडक्या लोकांनी सिद्ध केलं त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. ‘आकाशात देव आहेत आणि पृथ्वीवर लताचा स्वर आहे’ असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं. लतादीदींचं व्यक्तिमत्त्व, राहणीमान अत्यंत साधं होतं. भक्तीगीतं, भावगीतापासून ते उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं. त्यांच्या व्यक्मितत्त्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या नायिकेसाठी गायच्या तिच्यासोबत त्यांचा आवाज जुळायचा. ‘ज्यांच्यासाठी गायचं त्यांच्यासाठीच हा आवाज योग्य आहे’ अशी किमया चित्रपटक्षेत्रात आजवर दोघांनीच घडवून दाखवली. पहिले होते किशोरकुमार आणि दुसर्‍या लतादीदी! एक अलौकिक आणि दैवी सामर्थ्य असलेली ही गायिका होती. त्यांनी…

पुढे वाचा

सराव थांबला, साक्षात्कार हुकला…

आजूबाजूच्या घटना निराश करत असताना, यश हूल देऊन दूर जात असताना, कष्टाने रचलेले इमले डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असतानादेखील ज्याच्या वागण्यातून सकारात्मकता झळकते त्याला लोकं आज वेडा, स्वप्नाळू म्हणतात, पण उद्या त्याचीच एक यशस्वी माणूस म्हणून उदाहरणं देतात.

पुढे वाचा

देवदासींचे आर्थिक पुनर्वसन

सांगली जिल्ह्याच्या शासकीय पदावर मी १९८२ ते १९८५ असे तीन वर्ष कार्य केले. आधी दीड वर्ष जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुढील दीड वर्ष जिल्हाधिकारी म्हणून. लोकसंग्रहासाठी या दोन्ही पोस्ट म्हणजे आयएएस अधिकार्‍यांची पहिली पसंती. या काळात जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी जेवढा जवळून संबंध येतो तो या नंतरच्या वरिष्ठ पदावर काम करताना येत नाही. दिनांक २४ जानेवारी १९८३. सकाळी सकाळीच कमिशनरांचा फोन आला – ‘‘जिल्हाधिकारी म्हणून ऑर्डर मिळाली आहे ना? मग चार्ज का नाही घेतला?’’ मी म्हटले – ‘‘वर्तमान जिल्हाधिकारी यांनी विनंती केली आहे, या वेळचा २६…

पुढे वाचा