– कमलाकर देसले 9421507434 साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021 ॥ 1 ॥ श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ भगव्या कपड्यात गुंडाळण्याचा धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहे, असा सर्वसाधारण समज समाजात आहे. अर्थातच हा समज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि एकूणच संतसाहित्याच्या बाबतीतही आहे. हे भारतीय समाजाचे भयंकर दुर्दैव आहे. त्यामुळे हे ग्रंथ वृद्धांनी किंवा प्रौढांनी वाचण्याचे ग्रंथ आहेत अशी एक चुकीची मान्यता समाजात रूढ झाली आहे. ते ही अतिशय चुकीचे आहे. गीता हा ग्रंथ समुपदेशनाची नितांत गरज असणार्या तरुणांसाठी आणि सर्वांसाठी आहे.
पुढे वाचाCategory: व्हायरल
रक्तातले करारी आता इमान शोधा!
– जयेंद्र साळगावकर, मुंबई 9819303889 मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो! पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार!’’ अशी एका कीर्तनकाराने सांगितलेली आधुनिक टोपीवाल्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांनी तरुणांना संदेश देण्यासाठी या गोष्टीचा पुढे कीर्तनात…
पुढे वाचायांची पोटं तरी केवढी?
– प्रवीण दवणे सुप्रसिद्ध लेखक, ठाणे 9820389414 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ राजाला शिकार कुठली, यापेक्षा शिकार करण्यात मजा येते. तो त्याचा खेळ असतो. तो पाठलाग! ते काटेकुटं चुकवणं, टपून नेम साधणं, मातीनं अंग माखणं याचीच नशा असते राजाला! तसा हा आमचा खेळ! घोटाळा करणं, लपवणं, हेलिकॉप्टरनं धावाधाव! त्या आमच्या नावाच्या ब्रेकिंग न्यूज! आम्हाला पैशात इंटरेस्ट नाय! मोप जमिनी, बागा, कारखाने, बार, गुरढोरं, बंगले-माड्या, सात हजार पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट आमची! पण आपण असं जनतेला चकवू शकतो, हीच आमची नशा! तुम्ही कवी आहात! तुमची नशा कवितेची! आमची घोटाळ्यांची!
पुढे वाचाश्रीमंत योगी
उमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.
पुढे वाचाराजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?
संसदीय लोकशाहीला सुरूवात होऊन फार काळ उलटला नसल्याने आपल्याकडे राजकीय पक्षांचा इतिहास तसा जुना नाही. राजेशाही संपली, सरंजामशाही संपली, संस्थाने खालसा झाली आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या त्या ध्येयवादी गटाने पुढाकार घेत आपापल्या विचारधारांचे गट स्थापन केले. त्यांना राजकीय पक्षांचे स्वरूप आले. लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला. किमान तसा भास निर्माण करण्यात आला. त्यातून आपल्या लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. पूर्वीच्या काळातल्या टोळ्या नष्ट झाल्या आणि विचारसमूह अस्तित्वात आले. आजचे चित्र पाहता या पक्षांच्या पुन्हा टोळ्या झाल्यात की काय? असे वाटावे इतके झपाट्याने हे चित्र बदलले आहे.
पुढे वाचाकॅलिडोस्कोप – हायव्होल्टेज ड्राम्यांचा!
केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली आणि चर्चा सुरू झाली ती हायव्होल्टेज ड्राम्याची! एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडणे आणि त्याभोवती सगळे गरगरा फिरणे म्हणजे हायव्होल्टेज!
पुढे वाचाकोणता झेंडा घेऊ हाती?
राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं कुणाच्याही घरादाराची रांगोळी सहजपणे होते. गंमत म्हणजे वरिष्ठ स्तरावरील नेते कधी एकमेकांशी शत्रूत्व करतात आणि कधी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करतात हे सांगता येणे शक्य नसल्याने या सगळ्यात हाडवैर निर्माण होते ते मात्र सामान्य कार्यकर्त्यांत.
पुढे वाचामहाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व असलं तरी त्यांच्याकडे गांभीर्यानं पहाण्याचा द़ृष्टीकोन कमी होतोय.
पुढे वाचाउमद्या मराठवाड्याची नवी उमेद
मराठवाडा हे महाराष्ट्राचं हृदय आहे. आपल्या राज्यात जे काही चांगलं आहे त्यातलं सर्वोत्कृष्ट मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रातलं जागतिक कीर्तिचं पर्यटनस्थळ कोणतं असेल तर अजिंठा-वेरूळच्या लेण्या! जगभरातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक या लेण्या हमखास बघतात. महाराष्ट्रात या लेण्याइतकं बघण्यासारखं आकर्षक दुसरं काही नाही. महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी मराठवाड्यात आहे.
पुढे वाचापुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा
भारताची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणेच आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आता नव्याने तेवीस गावांचा समावेश केल्याने भौगोलिकदृष्ट्या पुणे ही सर्वात मोठी महापालिका झाली आहे. पुणे शहर कोणाचे? असा प्रश्न केला तर एकच उत्तर येते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे. पुणे लुटून, जाळून मुरार जगदेवानं कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला, पुणं बेचिराख केलं त्या पुण्यात छत्रपती शिवरायांनी जिजाऊसाहेबांच्या समोर सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हापासून पुणं हे अत्यंत सुजलाम, सुफलाम आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे.
पुढे वाचा