छ. शिवरायांसाठी ‘युद्ध’ हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे ‘साध्य’ होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ?
पुढे वाचाCategory: व्हायरल
पेचक
मुडदा बशिवला मेल्याचा!
कुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच! त्याचं समर्थन नाही होऊ शकत! मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच…
पुढे वाचानाकर्ती घराणी नाकारा
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही विचारधारा आदर्शवत माणून वाटचाल केली नाही. आपल्या सोयीनुसार यातील बहुतेकांनी सातत्यानं पक्षांतर केलं. ते वेगवेगळ्या पक्षात गेले, स्थिरावले, आपल्या भूमिका आणि विचार बदलले. येनकेनप्रकारेण सत्तेत कसं राहता येईल याचं कसब त्यांना अवगत आहे. काँग्रेस पक्षाचा विचार करता आमच्या विलासराव देशमुखांचं घराणं, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदमांचं घराणं काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं दिसतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. पद्मसिंह पाटील आदींच्या वारसांनी पक्ष बदलून आपलं बस्तान बसवलं.…
पुढे वाचाअशी ही सातार्याची तर्हा
‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर! छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’ बांधलं ते याच भूमीतल्या ‘रायरेश्वर’च्या पठारावर! ‘स्वराज्या’चा नाश करण्यासाठी आलेल्या आदिलशाही सरदार अफझलखानाचा वध छ. शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी केला. ‘स्वराज्या’च्या सीमा अरबी समुद्रापर्यंत भिडवल्या, त्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असलेली भूमी हीच! सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते याच भूमीतले! आलमगीर औरंगजेबाला शूर मराठ्यांनी झुंजवलं, त्याच्या मोगल साम्राज्याला खग्रास ग्रहण लागलं तेही याच परिसरात! १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या निधड्या-निर्भय सहकार्यांनी ‘ब्रिटिशांची’ सत्ता उखडून टाकून ‘पत्री सरकार’ स्थापन केलं होतं, तेही याच परिसरात!…
पुढे वाचायेशू ख्रिस्त : एक काल्पनिक व्यक्ती?
येशू ख्रिस्त आणि त्याचे जीवन हा नेहमीच चर्चेचा आणि वादांचा विषय राहिला आहे. श्रद्धाळू ख्रिश्चनांचा बायबलवर अढळ विश्वास असल्याने अर्थात ते या वादांकडे आणि विद्वानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यास आणि आक्रमक होत असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही परंतु संशोधनाच्या आणि चिकित्सेच्या जगात श्रद्धेला स्थान नसते. किंबहुना अनेक श्रद्धा अंधश्रद्धा बनण्याच्या मार्गावर असताना चिकित्सा या श्रद्धांचा भंग करत मानवी जगाला स्वच्छ आणि नितळ दृष्टी द्यायचे कार्य करत असते. ख्रिस्ती धर्माची मान्यता आहे की पॅलेस्टाइनमधील जेरूसलेमजवळील बेथलेहेम नावाच्या लहानशा गावात एका यहुदी (ज्यू) कुटुंबात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. वयाच्या 27-30…
पुढे वाचासाहित्यिक दुष्काळ निवारणारे ‘द.ता.’
आम्हाला गुरुजींनी व्याकरण शिकवताना तीन काळ शिकवले. वर्तमानकाळ सोडला तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आम्हाला आणखी एका काळाला सामोरं जावं लागलं. तो काळ म्हणजे ‘दुष्काळ…!’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारे पंढरपूर येथील ज्येष्ठ लेखक डॉ. द. ता. भोसले म्हणजे एक चालतंबोलतं विद्यापीठच म्हणायला हवं. ग्रामीण साहित्याच्या प्रांतात त्यांनी फक्त यथेच्छ मुशाफिरीच केली नाही तर खेड्यापाड्यातील अनेक लिहित्या अंकुरांना त्यांनी बळ दिलं आणि त्यातले अनेकजण आज डौलदार वृक्ष म्हणून साहित्यशारदेच्या दरबारात प्रभावीपणे पुढं आलेत. 8 मे 1935ला जन्मलेल्या भोसले सरांचा व्यासंग अफाट आहे. रयत शिक्षण…
पुढे वाचाजिजाऊ
कसे व्हावे संगोपण कसे पुत्र घडवावे जेव्हा प्रश्न हे पडती उल्लेख फक्त तिचा! तिचे दिव्य ते संस्कार झाला शिवबा साकार जशी दैवी ती कुंभार अशी राजमाता जिजा!
पुढे वाचागीता धर्मग्रंथ नाही!
– कमलाकर देसले 9421507434 साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021 ॥ 1 ॥ श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ भगव्या कपड्यात गुंडाळण्याचा धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहे, असा सर्वसाधारण समज समाजात आहे. अर्थातच हा समज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि एकूणच संतसाहित्याच्या बाबतीतही आहे. हे भारतीय समाजाचे भयंकर दुर्दैव आहे. त्यामुळे हे ग्रंथ वृद्धांनी किंवा प्रौढांनी वाचण्याचे ग्रंथ आहेत अशी एक चुकीची मान्यता समाजात रूढ झाली आहे. ते ही अतिशय चुकीचे आहे. गीता हा ग्रंथ समुपदेशनाची नितांत गरज असणार्या तरुणांसाठी आणि सर्वांसाठी आहे.
पुढे वाचारक्तातले करारी आता इमान शोधा!
– जयेंद्र साळगावकर, मुंबई 9819303889 मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो! पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार!’’ अशी एका कीर्तनकाराने सांगितलेली आधुनिक टोपीवाल्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांनी तरुणांना संदेश देण्यासाठी या गोष्टीचा पुढे कीर्तनात…
पुढे वाचा