जागो मोहन प्यारे!

जागो मोहन प्यारे!

“एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. “महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन ‘सरकारी अधिकारी’ अशी बतावणी केली की ‘पॉश’ दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो.”

पुढे वाचा

जगबुडी माया

जगबुडी माया

सुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही शिळा कोणी तयार केली याचा संशोधकांनी तेव्हापासून आत्तापर्यंत शोध घेतला पण काहीही हाती लागले नाही. बहुदा स्पॅनिश समुद्रडाकूंनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केले व त्याची सर्व संपत्ती खरवल्यासारखी लुटून नेली.

पुढे वाचा

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ अभ्यासच आहे असे नाही तर ते जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून या महामानवांच्या विचारांचा प्रसार करतात. म्हणूनच त्यांची निवड…

पुढे वाचा

रंदागुली इमला

रंदागुली इमला

मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत.

पुढे वाचा

21 व्या शतकातील दोन द्रष्टे

21 व्या शतकातील दोन द्रष्टे

– अनिल किणीकर (चपराक दिवाळी विशेषांक 2013) एक स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री असताना आणि नंतर अत्यंत धनाड्य झाल्यावरही अत्यंत साधेपणाने राहायचा, वागायचा.

पुढे वाचा

आम्ही कविसंमेलनांची अपत्ये

जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळे छापील स्वरुपात कविता जाणकारांपुढे येण्याचं भाग्य आम्हा कवींना सुरुवातीला लाभलं नाही.

पुढे वाचा

सर्वार्थाने गुरू

सर्वार्थाने गुरू

विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्‍वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली.

पुढे वाचा

तो सुवर्ण योग

तो सुवर्ण योग

मासिक साहित्य चपराक, सप्टेंबर 2018 एका थोर माणसाच्या आणि माझ्या नावात खूप साधर्म्य, ते म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे सर्वेसर्वा अप्पा आणि मी पण अप्पा!

पुढे वाचा

स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस

स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस

‘थॉमस कुक’तर्फे आम्ही युरोप सहलीला निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी 3 जुलैच्या ऐवजी 6 जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जमानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्सची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबईमधल्या इमराईट्सच्याच आलीशान हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोहोचलो आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो.

पुढे वाचा