जयाते कामधेनू माये!

जयाते कामधेनू माये!

प्रतिमा पूजन झाले. सगळे आपापल्या जागेवर बसले. सूत्रसंचालकाने भाषण करण्यासाठी माझे नाव पुकारले. मी प्रतिमेला नमस्कार केला आणि भाषण करण्यासाठी डायसकडे गेलो. सभोवार दृष्टी फिरवली. आता भाषणाला सुरूवात करणार इतक्यात हर्षदा उभी राहिली.

पुढे वाचा

21 व्या शतकातील दोन द्रष्टे

21 व्या शतकातील दोन द्रष्टे

– अनिल किणीकर (चपराक दिवाळी विशेषांक 2013) एक स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री असताना आणि नंतर अत्यंत धनाड्य झाल्यावरही अत्यंत साधेपणाने राहायचा, वागायचा.

पुढे वाचा

नगर-एक पर्यटन स्थळ

नगर-एक पर्यटन स्थळ

आम्हाला नगर शहरच नाही तर सबंध जिल्ह्याचा अभिमान आहे. अहमदनगर जिल्हा संतांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ई.स. 1272 मध्ये ज्ञानेश्वरी कथन करताना ज्या खांबाला ते टेकून बसत तो नेवासे येथील ‘पैस’ खांब भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. या पवित्र स्तंभावर चंद्र, सूर्य आणि शिलालेख कोरलेला आहे. नेवासे नगरहून केवळ 56 किलोमीटरवर आहे. देव आहे पण देऊळ नाही, घरे आहेत पण दारे नाहीत असं शनी देवाचं जागृत देवस्थान शनी-शिंगणापूर नगरपासून 38 किलोमीटरवर आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असणारे शिर्डी, साईबाबांचे समाधी मंदीर नगरपासून 81 किलोमीटरवर आहे. बाबांच्या वास्तव्याच्या खुणा ते…

पुढे वाचा

हाऊ इज द जोश…?

हाऊ इज द जोश...?

दिवसभर पक्षाच्या कार्यालयात प्रचाराची तयारी पूर्ण करून रात्री तो उशीरा घरी येतो. कपाटातले पांढरे खादीचे कपडे बाहेर काढून, त्याला कडक इस्त्री करून, बुटाला पॉलिश करून न जेवता तो झोपतो. असंही त्याला जेवण जाणार नव्हतं कारण उद्याचा उजाडणारा दिवस हा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तो ज्या पक्षासाठी, नेत्यासाठी दिवसरात्र लढायचा आज तोच नेता त्याच्या भागात, गावात येणार होता. शेजारच्या गावात तसं सभेचं रणशिंग फुंकेलेलं होतं. उद्या साहेबांना पाहता येणार, भेटता येणार, त्यांना केलेलं काम दाखवता येणार म्हणून तो खूप खुश होता. कधी दिवस उजाडेल आणि मी साहेबांना भेटेल असं त्याला झालं.…

पुढे वाचा

माझा साहित्य प्रवास …

लहानपणापासूनच घरात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य उपलब्ध होते. कथा, कादंबर्‍या, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची रेलचेल असायची. ग्रामोफोन असत्यामुळे एचएमव्हीच्या जुन्या चित्रपट गाण्यांच्या रेकॉर्डही असायच्या. संध्याकाळच्या वेळी वडील चित्रपटांचे सुमधूर आणि आशयघन अशी गाणी ऐकायचे. त्यामुळे सी रामचंद्र, नौशाद यांच्या तालवाद्यावर आणि लता मंगेशकर, तलत मेहमूद, बेगम अख्तर यांची अजरामर गाणी ऐकायला मिळायची. एक प्रकारचं भारलेलं वातावरण असायचं आणि त्याचमुळे अवीट चवीची, शब्दालंकाराने गीतरचना भावायला लागली. वाचनाची आवड वाढायला लागली आणि साहित्यातील रूची निर्माण झाली. अंतरीच्या गाभार्‍यातून शब्द उसळी मारू लागले. शब्दाला शब्द जोडून ओळ तयार झाली आणि पाचवीत असताना जीवनातील पहिली कविता…

पुढे वाचा

माझीही एक पणती..

‘‘जीवनात तुम्हाला लिखाणाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?’’ असा प्रश्‍न मला कोणी केला तर माझं उत्तर असेल – ‘‘जीवनाकडूनच!’’ होय! आपण जर जगता-जगता या जीवनाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्याला ते खूपकाही सांगत असतं, दाखवत असतं. 2010 साली पुण्यात ‘एमबीए’ शिक्षणासाठी आलो आणि इथे त्या दोन वर्षांमध्ये जे जीवन जगलो ते अतिशय विलक्षण होतं.

पुढे वाचा

थोडं मनातलं…

‘चपराक’ साप्ताहिकासाठी दर आठवड्याला एक तरी वाचनीय  लेख तुम्ही लिहावा, अशी प्रेमळ ताकीद संपादकांकडून मिळाली आणि मग सर्वसामान्य माणसाला (कॉमन मॅन) डोळ्यासमोर ठेवून, दैनंदिन जीवनात त्याला पडणारे निरनिराळे प्रश्न, त्यांच्या समस्या याविषयी लिहित गेलो. आपण एकटे का पडतो? माणसं अशी का वागतात? आजचे शिक्षक गुरू कधी होणार? तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे का? इतका आटापिटा कशासाठी? ग्राहक राजा कधी होणार? ही जीवघेणी लालसा कधी थांबणार?

पुढे वाचा

लोककवी मनमोहन

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत.

पुढे वाचा

जयाजीपेक्षा महत्त्वाचा आहे शेतकरी संपाचा विजय

शेतकरी नेते शरद जोशी यांनी संपूर्ण हयात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर खर्ची घातली मात्र राज्यातील वा देशातील शेतकरी कधीच एकजुटीने जागृत झाला नाही. विपूल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि त्यातून येणारी आर्थिक सधनता ही या असंघटितपणाला कारणीभूत होती. यामुळे बळीराजाने काळानुरूप स्वतःत आणि शेती पध्दतीत बदल करत आपल्या भवितव्याची काळजी  घेतली नाही.

पुढे वाचा