कुठे लाठीहल्ला, कुठे अश्रुधारांचा वापर, कुठे हवेत गोळीबार, कुठे प्रत्यक्ष गोळीबार झाला की सामान्य नागरिकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, अगदी गल्ली ते दिल्ली जर कुणाला जबाबदार धरले जात असेल तर ते म्हणजे पोलीस यंत्रणेला! पण खरेच का प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी पोलिसच जबाबदार असतात काय? बारा-पंधरा तास सेवा बजावणारे पोलीस इतके निर्दयी, निष्ठुर आहेत का की ते निष्पाप लोकाच्या जीवावर उठतील?
पुढे वाचाCategory: साप्ताहिक
Marathi Saptahik Published By Chaprak Prakashan
तेवीं जालेनि सुखलेशें
सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली.
पुढे वाचाहे जीवन सुंदर आहे!
अलीकडेच एक बातमी वाचनात आली… फेसबुकवर एकाने पोस्ट टाकली की, ‘मी माझे जीवन संपवित आहे’
पुढे वाचातुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी
लगबगीने मॅडम वर्गात आल्या. पर्स टेबलवर ठेवली. स्कार्फने घाम पुसला. पर्समधला फोन काढून टेबलवर ठेवला. तेवढ्यात व्हाट्सअपची नोटिफिकेशन बेल वाजली. कोणाचा मेसेज असावा म्हणून त्यांनी व्हाट्सअप ओपन केलं तर व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवलेले होते. त्यांनी फोटोमध्ये बघितलं तर त्यांचाच फोटो होता. कालचा. गांधी जयंती साजरी करतानाचा. नंबर ओळखीचा नाही म्हणून मॅडमांनी त्या नंबरवर फोन लावला. विचारलं, “कोण तुम्ही?’
पुढे वाचा‘मिशन एम्प्लॉयबल’चा आधार गेला
अन्न, वस्त्र, निवारा अशा कोणत्याही मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतील तर हाताला काम असणं गरजेचं असतं. गेल्या दशकातील बदलते ट्रेंड पाहता आय. टी. क्षेत्र झपाट्यानं वाढलं. जगभर रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ‘आयटीत जा आणि ऐटीत जगा’ असं पालकांकडून सांगण्यात येऊ लागलं. आयटीतल्या मुलांचा लग्नाच्या बाजारातला भावही वाढला. संगणक क्रांती झाल्यावर आयटीमुळं अनेकांचं जगणं सुधारलं. अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आलं.
पुढे वाचासक्षम भारतीय महिला
एक आदर्श सोसायटी म्हणून नावाजलेल्या आमच्या सोसायटीमध्ये काही चांगल्या प्रथा आम्ही सुरुवातीपासूनच अमलात आणल्या आहेत. त्यामध्ये श्री दत्त जयंती, श्री गणेशोत्सव, दहीहंडी, कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमा वगैरे सण उत्सव आम्ही सार्वजनिकरित्या साजरे करतो. ज्यायोगे आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगतो!
पुढे वाचाविद्येच्या देवतेचा वाचनसंदेश
आज गणेश चतुर्थी. ह्या दिवशी आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. त्याच्यापुढे छान आरास करतो. आपल्यातील कलागुणांना वाव देतो! परंतु ह्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ह्या विषाणूमुळे जगभर अगदी हाहा:कार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे जग कसे ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात तर ह्या विषाणूने कहरच केला आहे. गेले पाच-सहा महिने झाले सगळे व्यवहार बंद होते. सगळ्यांच्या अंगात आणि मनात नकारात्मकता भरली आहे. ह्या सगळ्या नकारात्मकतेत गणपती बाप्पाच्या आगमनाने मनाला आता कुठे थोडीशी उभारी आली आहे. सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. त्यात सगळीकडे छान पाऊसही झाला आहे. सगळी धरणे ओसंडून वाहिली आहेत. अर्थात काही…
पुढे वाचारंदागुली इमला
मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत.
पुढे वाचासर्वार्थाने गुरू
विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली.
पुढे वाचा‘काळीजकाटा’ कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे, (प्रतिनिधी) : ‘चपराक‘ने प्रकाशित केलेल्या सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ या कादंबरीला ऑगस्टमध्ये दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी, गदिमा प्रतिष्ठान व नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सांगोला तालुक्यातील चोपडीचे सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.
पुढे वाचा