ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे.
पुढे वाचाCategory: साप्ताहिक
Marathi Saptahik Published By Chaprak Prakashan
जगातलं पहिलं प्रेमपत्र
आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तिच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणार्याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत.
पुढे वाचाइन्सान ढुंढने मै चला…
माणूस हा जगाच्या पाठीवर एकच असा प्राणी आहे, ज्याला वाटतं आपण सगळं काही करु शकतो. आपण अख्ख्या जगावर नियंत्रण ठेवू शकतो, एवढा तो महत्त्वाकांक्षी होत चालला आहे. बटन दाबताच त्याला सर्व कसं समोर हजर पाहिजे असतं. सगळ्या यंत्रणांंचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असावं अशीच त्याची अपेक्षा असते. सर्वांनी आपलंच ऐकून घ्यावं, असा त्याचा सतत आग्रह असतो!
पुढे वाचाभूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान आगंतुकाची स्वगते
अभिव्यक्ती प्रामाणिक असली की थेट हृदयाच्या गाभ्यातून कविता जन्माला येते. मातीच्या मुळापर्यंत गेलं की जोमानं पीक तरारून येतं, हीच गोष्ट कवितेबाबतची. सभोवतालचा अस्वस्थ करणारा काळ मोठा विचित्र आहे. अशावेळी कवीची होणारी अस्वस्थ घालमेल म्हणजे कवितेपूर्वीची स्वतःची सोलुन निघण्याची जणू एक प्रक्रियाच असते. त्यातुन येणारी अस्सल कविता म्हणजे स्वतःला चिंतनातून व्यक्त करणारी एक साधनाच असते.
पुढे वाचामहाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग!
माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहाने वाचले. एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा ते वाचल्यावरच माझे समाधान झाले. रमेश वाघ हे स्वत: उत्तम कीर्तनकार तर आहेतच…
पुढे वाचाझुंडशाहीचं करायचं काय…?
सार्वजनिक उपद्रव आणि झुंडशाही म्हणजे सार्वजनिकपणे जनक्षोभ किंवा जनआंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, एखादी गोष्ट करण्यापासून वाटेल त्यास बेकायदा प्रतिबंधीत करणे अथवा करवून घेण्यासाठी उपद्रव्यमूल्य वापरून अथवा तसे करण्याची धमकी देऊन केलेली दडपशाही अथवा दंडेलशाही होय.
पुढे वाचाही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे
लेखक, पत्रकारांवर हल्ले करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे! एखाद्या व्यक्तिला एखाद्याच्या मतांबद्दल आपत्ती किंवा मतमतांतरे असतील तर त्याने त्याच माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत. कारण दोन विद्वान जेव्हा वाद घालतात तेव्हा त्यातून येणारे परिणाम हे कायमच सुखद असतात.
पुढे वाचाआठवणींचा सुगंध
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठायी असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्याहव्याशा वाटणार्या आठवणी मनातील या कोपर्यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती व विचारांभोवती रूंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
पुढे वाचाफ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक
रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात.
पुढे वाचासुखायु… हितायु!
चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा दिवाळी अंक मागविण्यासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांच्या घराण्यांमध्ये एक रीतीरिवाज होता. राजवाड्यामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले की त्याची जन्मकुंडली मांडली जात असे. त्याबरोबरच त्याची आयुर्मर्यादा कशी असेल? त्याचे आरोग्य कसे असेल? यांचे त्या नवजात अर्भकाच्या शरीरयष्टीवरून परीक्षण केले जाई.
पुढे वाचा