सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी ‘चपराक प्रकाशन’ची सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ ही कादंबरी वाचून दिलेली प्रतिक्रिया. ही कादंबरी घरपोच मागवण्यासाठी या लिंकला भेट द्या – http://shop.chaprak.com/product/kaalijkaata/
पुढे वाचाCategory: बातम्या
Latest Marathi News Published
कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न
जुन्नर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे पार पडली. यात सात जिल्ह्यातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणार्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. या कार्यशाळेत दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजानांची माहिती दिली. कृषी पर्यटनासंबंधी, भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास…
पुढे वाचाभाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध
पुणे, (प्रतिनिधी) : ज्या नगरसेकांना पुण्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविकेने डॉक्टरांना मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टिने अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. अशा प्रकारात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई झाल्यास समाजामध्ये डॉक्टरांविषयीचा आदर टिकून राहण्यास मदत होईल; तसेच डॉक्टरांना रूग्णसेवा करताना कुठल्याही भीतीखाली काम करण्याची दहशत राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी व्यक्त केले. भाजपच्या नगरसेविका सौ. आरती कोंढरे यांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि…
पुढे वाचाजात आणि धर्म नसलेली भारतातील पहिली महिला
जात जात जाईल जात! समता, स्वातंत्र्य आणि न्याय यापासून दिशाहीन राहिलेल्या सामाजिक प्रवाहाविरुद्ध बंड केला तरच इतिहास आपली दखल घेतो. आज आपल्यासमोर किंवा आपल्याकडून काही चुकीचे होत असताना किंबहुना आपल्याला काही चांगले काम करण्याची संधी असताना, आपण मूग गिळून म्हणा किंवा मूग न गिळता म्हणा गप्प राहतो, गप्प बसतो हे वेगळे सांगायची गरज नाही परंतु, काही दिवसापूर्वीच असा बंड केला आहे तामिळनाडूतील तिरुपाथुर या शहारातील एका स्त्रीने! एम. ए. स्नेहा यांनी! या अशा पहिल्या भारतीय नागरिक आहेत ज्यांना कसली जात नाही आणि कसला धर्म नाही! तामिळनाडूमध्ये वकीली करणार्या स्नेहाताईंनी देशातील…
पुढे वाचावा. ना. उत्पात यांचा ‘चपराक’कडे खुलासा
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव ‘अहल्या’ असावे अशी अपेक्षा साहित्यिक आणि विचारवंत वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर धनगर बांधवात असंतोष पसरला होता. समाजशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उत्पातांचे विधान सप्रमाण खोडून काढले. ‘चपराक’ने हे वृत्त प्रकाशित करताच वा. ना. उत्पात यांनी त्यांचा खुलासा ‘चपराक’कडे पाठवला आहे. तो त्यांच्याच शब्दात. पुण्याश्लोकी अहिल्याबाईंच्या नावाला माझा विरोध नाही – उत्पात सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोकी अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे दुरूस्त करावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. अहल्याबाईंची थोरवी सर्व भारतात बद्रीनाथ ते कन्याकुमारी…
पुढे वाचाअहिल्यादेवी हेच नाव बरोबर!
वा. ना. उत्पातांनी समाजाची माफी मागावी संजय सोनवणी यांची मागणी होळकर घराण्याबाबत वारंवार खोटे आक्षेप घेत प्रवाद पसरवले जातात. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यासही होळकरांबद्दल असलेल्या असुयेपोटी विरोध केला जात होता. ‘विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिले तर समाजात तेढ माजेल’ असे वादग्रस्त विधानही शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी केले होते. आता विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ज्यांचा पोटशूळ उठला आहे ते आता अनैतिहासिक वायफळ वाद उकरुन काढत आहेत. यामुळे समाजात नाराजी पसरली असून धनगर समाजाची एक तरी मागणी मान्य झाली म्हणून झालेल्या आनंदावर विरजण घालण्याचा अक्षम्य प्रकार श्री. उत्पातांकडून घडला आहे. – संजय…
पुढे वाचाडॉ. उज्ज्वला हरपळे यांची नियुक्ती
लोणी काळभोर, (प्रतिनिधी) : डॉ. उज्ज्वला हरपळे यांची महिला व बालविकास राष्ट्रीय सल्लागार समितीवर केंद्रीयमंत्री मनेकाजी गांधी यांनी नियुक्ती केली असून फुरसुंगी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना डॉ. हरपळे यांनी सांगितले की, समाजसेवेचा वसा सासरे एकनाथराव हरपळे गुरुजी यांच्यापासुन मिळाला असून यापुढे तो तसाच चालू राहिल. फुरसुंगी हे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असेलेलं गाव. येथील एकनाथराव हरपळे गुरुजी यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांचे पुत्र डॉ. बाळासाहेब हरपळे आणि सूनबाई डॉ. उज्ज्वला यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. डॉ. हरपळे ऐश्वर्या…
पुढे वाचा‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन
मुंबईत ब्राह्मण उद्योजक परिषद संपन्न मुंबई : येथे पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, गोविंद हर्डीकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे चेअरमन योगेश जोशी, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील अशा अडीचशे उद्योजकांच्या उपस्थितीत ‘ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स’ पार पडली. यात ‘चपराक’तर्फे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे आणि वाचकप्रिय लेखक सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. भाऊ तोरसेकर यांनी 1964 ते 2014 या कालखंडातील देशाच्या राजकारणाचा राजकीय पट या पुस्तकाद्वारे उलगडून…
पुढे वाचावाचन संस्कृतीला नवी दिशा
सातारा येथील वाचकप्रिय असलेल्या दै. ‘ऐक्य’मध्ये ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘लोलक’ या सदरात आज (19 फेब्रुवारी 2019) संपादकीय पानावर ‘चपराक’च्या उपक्रमाची दखल घेतली आहे. प्रकाशक म्हणून हा आम्हाला मोठा सन्मान वाटतो. अवश्य वाचा. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. महाराष्ट्रातील मराठी भाषकांची लोकसंख्या दहा कोटी असली तरीही गेल्या वीस वर्षात दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, व्हॉटस ऍप, फेसबुक अशा झपाट्याने वाढलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीला ग्रहण लागल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मुळातच मराठी भाषिक वाचकांना पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय खूप कमी असल्याने एक हजार पुस्तकांची आवृत्तीही दोन-चार वर्षात संपत…
पुढे वाचासंभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा म्हणजे औचित्यभंग-सदानंद मोरे
पुणे, (चपराक प्रतिनिधी) ः पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ‘तो पुतळा संभाजी उद्यानात परत बसवू’ हा भाजपचा निवडणुकीतील प्रचारातला प्रमुख मुद्दा होता. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाला या मुद्याचा सोयीस्कर विसर पडलेला असतानाच ‘संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणे हा औचित्यभंग आहे.
पुढे वाचा