– श्रीराम पचिंद्रे 7350009433 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 ओडिशाची राजधानी कटक येथे नामवंत वकील जानकीनाथ बोस वकिली करायचे. जानकीनाथांची कोलकत्त्यात मोठी वास्तू होती. ते कटकहून कोलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वारंवार यायचे. त्या निमित्तानं घरी येऊन मुलांशी संवाद साधता यायचा. त्यांचे सतीश हे पहिले पुत्र. शरदचंद्र हे दुसरे पुत्र. ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते. ते उच्च न्यायालयात उत्तम प्रकारे वकिली करायचे. सुभाष हे जानकीनाथांचे आठवे पुत्र. ते बी. ए. झाले होते.
पुढे वाचाCategory: मासिक
हेच खरे जगज्जेते…
– विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’ जगातील सर्वात मोठा क्रीडा स्पर्धांचा सोहळा असं ऑलिंपिक स्पर्धेचं वर्णन करण्यात येतं. यावेळी मात्र कधी नव्हे इतकी आव्हानात्मक परिस्थिती या सोहळ्यावर उद्भवली होती. त्याला कारणही तसंच होतं, अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी कोरोना विषाणूची महाभयंकर साथ! त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली. 2020 साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा प्रत्यक्षात 2021 मध्ये पार पडली! यावेळी ऑलिंपिकच्या आधीच्या घोषवाक्यात पहिल्यांदाच एक महत्त्वपूर्ण शब्द जोडला गेला… तो म्हणजे एकत्र! ‘सिटियस, फोर्टियस, आल्टियस व कोम्युनिस’ अर्थात ‘वेगवान, सामर्थ्यवान, उत्तुंग आणि…
पुढे वाचाप्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा
देवेंद्र रमेश राक्षे ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 ‘प्लॅस्टिक, थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत’, ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’ असे सांगणारा जगातला मी पहिला ‘वेडा पीर’ ठरू द्या! पण अतिशय गांभीर्याने मी हे वाक्य लिहीत आहे आणि हे वाक्य लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी अतिशय कष्ट, मेहनत आणि प्रशिक्षण देखील घेतले आहे. ‘साधन’ या संस्थेतील माझे गुरु आणि शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव गाडगीळ यांच्या हाताखालील माझी साधना यांना स्मरून मी हे गंभीर वाक्य पुनः पुन्हा व्यक्त करीत आहे – ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’,…
पुढे वाचायाजसाठी केला होता अट्टहास
– डॉ. रामचंद्र देखणे 9503263046 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 आपल्या भूतकाळात जरा अंतर्मुख होऊन डोकावले की घडलेल्या प्रसंगांमधून आपल्याच जीवनातील एका जाणिवेची सृजनता सहजपणे उभी राहात असल्याचे जाणवते. त्यातील काही प्रसंग हे प्रेरणा देणारे असतात, काही स्वाभिमान जागवणारे, काही आवेश आणि उत्साह निर्माण करणारे, काही दिशादर्शी, काही कृतज्ञतेचे पथदर्शी, शांती, सुचित्व, आर्जव, स्थैर्य आणि अनहंकाराचे अनुदर्शन घडविणारे तर काही अहंकार जागविणारे, आत्मविश्वास गमावणारे, भविष्याच्या अंधार्या वाटेवर चाचपडायला लावणारे तर काही वैफल्य आणि उदासीनतेच्या गर्द छायेत लोटणारे! खरोखरीच जीवन म्हणजे अशा भिन्नभावदर्शी अनेकविध घटना आणि प्रसंगांचे एक संमेलनच असते. अशाच…
पुढे वाचाचिरंतनाची ओढ असणारा कवी
स्वतःला प्रतिभासंपन्न म्हणवून घेणार्या काही कवींचे कवितेशी असलेले नाते फक्त शब्दांपुरतेच असते पण ज्यांच्या धमन्याधमन्यातून फक्त कविता आणि कविताच वाहत होती असे अपवाद्भूत कवी म्हणून सुधीर मोघे यांचा उल्लेख करावा लागेल. मोघे कवितेत रमले पण इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी चालूच राहिली. कवितेबरोबरच पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, निवेदन या क्षेत्रांमध्येही ते लीलया वावरले.
पुढे वाचाआंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री
– प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 9850270823 1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे हत्यार म्हणजे शिक्षण,’’ अशी बाबासाहेबांची धारणा होती.
पुढे वाचानिर्वाण
कथाकार गदिमांचा इतका सुंदर परिचय दिनकर जोशी यांनी करून दिल्यानंतर खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी गदिमांची एक कथा पुनर्प्रकाशित करीत आहोत. मूळ कथा असल्याने यातील भाषा आणि व्याकरण अर्थातच त्यांच्या त्यावेळच्या कथेतल्याप्रमाणे आहे. आजच्या कट्टरतावादाच्या काळात ही कथा वाचकांना एक वेगळा विचार देऊन जाईल. – संपादक
पुढे वाचाकल्पतरू आण्णा
मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात बसलो होतो. पीएच.डी. प्रबंधलेखनाचे काम दररोज नित्यनेमाने करत होतो. त्याकरिता लागणारे संदर्भ गोळा करून ते वाचून काढत होतो. त्यांचा आधार घेत-घेत प्रबंधलेखनाला गती देत होतो. त्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून ठीक सात वाजता जयकर ग्रंथालयाच्या वाचनकक्षासमोर रांगेत उभा राहिलो. ग्रंथालयाचा वाचनकक्ष उघडण्यापूर्वी रांगेत उभे राहणे, क्रमाक्रमाने आपली नोंद करून वाचन कक्षात प्रवेश करणे, आपली जागा पकडणे व तेथे दिवसभर लेखन-वाचन करणे हा माझा नित्य परिपाठ झाला होता.
पुढे वाचाआर्थिक साक्षरता
उत्पन्नाचे दोन प्रकार असतात. हे उत्पन्न वापरायचे काही निकष आहेत. पैसे हाताळण्याच्या पण पद्धती आहेत. जो माणूस पैशाकरता काम करत असताना, हळूहळू त्यालाच आपला गुलाम बनवायला शिकतो, कालांतराने त्याच्या जीवनात अशी वेळ येते की, आता त्याच्याकरता फक्त पैसाच काम करुन दर महिन्याला त्याला उत्पन्न आणून देतो. तो स्वतः आता पैशाकरता काम करायचं बंद करतो. आपले आयुष्य मस्त जगत राहतो. असा माणूस पूर्णपणे आर्थिक साक्षर झाला असे समजण्यास हरकत नाही. चला मग आता आर्थिक साक्षर होण्यासाठी कसे वागायचे किंवा कसे वागायचे नाही ते पाहूया.
पुढे वाचागदिमांच्या कथा
मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी झाली. फारसे कार्यक्रम झाले नाहीत. ‘नाव गदिमांचे आणि कार्यक्रम स्वतःचे’ असे काही झाले. मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्या साहित्यावर एक चर्चासत्र घेतले. चित्रपट व्यवसायात हयात घालविलेले माडगूळकर त्यांच्या चित्रपट गीताने ओळखले जातात. गदिमा त्यांच्या बालगीतांनी, चित्रपटातील भावगीतांनी आणि विशेष म्हणजे गीतरामायणामुळे लोकांसमोर आहेत! पण या लेखात आपण कथाकार माडगूळकरांचा परिचय करून घेणार आहोत, जो महाराष्ट्राला फारच कमी आहे.
पुढे वाचा