सहकार चळवळीचा दीपस्तंभ

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधली. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो अर्थातच सहकाराचा! त्यातही देशाचा विचार करता सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच अव्वल योगदान दिले आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुकचे. सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या धुरिणांची एकत्रित माहिती आजवर मराठी साहित्यात नव्हती. मात्र भालचंद्र कुलकर्णी यांनी सहकार भारती या संस्थेच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प तडीस नेला असून त्यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेल्या ‘सहकार महर्षी’ या दणदणीत ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यात थोड्याथोडक्या…

पुढे वाचा

तुझ्याविना

इतकं पूर्णपणे नवर्‍याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्‍या समर्पित तुला मी कसा विसरेन? तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊजाताना… की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी…’’ काय बोलणार?

पुढे वाचा

चांगल्या माणसाच्या जाण्याने…

नोव्हेंबर 2021… अगदी दोनच महिन्यांपूर्वीची गोष्ट… पुण्यातील पत्रकार कॉलनीतल्या अवचटांच्या घराच्या पायर्‍या मी चढत होतो.‘शिक्षणविवेक’च्या डिसेंबरच्या अंकासाठी ‘संवेदनशीलता’ या विषयावर त्यांची मुलाखत घ्यायची होती. प्रचंड कुतूहल आणि काहीशा भीतीनेच घराची बेल वाजवली. कामवाल्याताईंनी दार उघडलं आणि “मी मुलाखत घ्यायला आलोय”, असं म्हणताच आतून “या या, चहा ठेव गं आम्हाला!” असा आवाज आला. मी आत गेलो आणि नंतर सुमारे तासभर फक्त ऐकत होतो. मध्येमध्ये प्रश्‍न विचारत होतो. अनिल अवचट नावाची व्यक्ती नाही तर, एक समाजमन आणि समाजभानसुद्धा खूप पोटतिडकीने बोलतंय, असं वाटत होतं.

पुढे वाचा

मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण!

डोंबिवली येथे झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे आणि ‘चपराक’चे संपादक प्रकाशक घनश्याम पाटील यात सहभागी झाले होते. सचिन केतकर या सत्राचे समन्वयक होते. या चर्चासत्रातील घनश्याम पाटील यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

पुढे वाचा

उदासीनांना लटकवा!

अकार्यक्षम प्रशासनानं सातत्यानं देशाची दुरावस्था झाली आहे. यामुळं राज्यकर्त्यांची डोकेदुखीही वाढली आहे. अर्थात अशा गोष्टींसाठी केवळ प्रशासन जबाबदार नसतं तर ते प्रशासन राबवणारे राज्यकर्तेही तितकेच जबाबदार असतात.

पुढे वाचा

एलियन

आपल्या पृथ्वी सारख्या अनेक पृथ्वी इतर आकाशगंगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यावरही जीवसृष्टी असल्याचा अंदाज नेहमी व्यक्त केला जातो. इतर ग्रहांवरील सजीवांना ‘एलियन’ असं संबोधलं जातं. विदेशात त्यांना ‘यूएफओ’ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ असं म्हटलं जातं. यांच्या शरीराची ठेवण व यांचा आकार वेगळ्या ढंगाचा असल्याचे बोलले जाते. एलियन पाहिल्याचा दावा अनेक जण करत असतात.

पुढे वाचा

साहित्यिक दुष्काळ निवारणारे ‘द.ता.’

आम्हाला गुरुजींनी व्याकरण शिकवताना तीन काळ शिकवले. वर्तमानकाळ सोडला तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आम्हाला आणखी एका काळाला सामोरं जावं लागलं. तो काळ म्हणजे ‘दुष्काळ…!’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारे पंढरपूर येथील ज्येष्ठ लेखक डॉ. द. ता. भोसले म्हणजे एक चालतंबोलतं विद्यापीठच म्हणायला हवं. ग्रामीण साहित्याच्या प्रांतात त्यांनी फक्त यथेच्छ मुशाफिरीच केली नाही तर खेड्यापाड्यातील अनेक लिहित्या अंकुरांना त्यांनी बळ दिलं आणि त्यातले अनेकजण आज डौलदार वृक्ष म्हणून साहित्यशारदेच्या दरबारात प्रभावीपणे पुढं आलेत. 8 मे 1935ला जन्मलेल्या भोसले सरांचा व्यासंग अफाट आहे. रयत शिक्षण…

पुढे वाचा

जिजाऊ

कसे व्हावे संगोपण कसे पुत्र घडवावे जेव्हा प्रश्न हे पडती उल्लेख फक्त तिचा! तिचे दिव्य ते संस्कार झाला शिवबा साकार जशी दैवी ती कुंभार अशी राजमाता जिजा!

पुढे वाचा

इतिहास संशोधनातील ‘गजानन’

चंद्रपूरचे संशोधक प्रा. प्रशांत आर्वे पुण्यात आले होते. ते म्हणाले, “दादा, गेल्या तीन वर्षांपासून गभांना भेटायचा प्रयत्न करतोय. माझं त्यांच्याकडे काहीही काम नाही. या ज्ञानमहर्षीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा त्यांचा वेळ हवाय. काहीही करून आमची भेट घडवून आणा.”

पुढे वाचा

सुभाष ते नेताजी : एक साहसी गरूडझेप

– श्रीराम पचिंद्रे 7350009433 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 ओडिशाची राजधानी कटक येथे नामवंत वकील जानकीनाथ बोस वकिली करायचे. जानकीनाथांची कोलकत्त्यात मोठी वास्तू होती. ते कटकहून कोलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वारंवार यायचे. त्या निमित्तानं घरी येऊन मुलांशी संवाद साधता यायचा. त्यांचे सतीश हे पहिले पुत्र. शरदचंद्र हे दुसरे पुत्र. ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते. ते उच्च न्यायालयात उत्तम प्रकारे वकिली करायचे. सुभाष हे जानकीनाथांचे आठवे पुत्र. ते बी. ए. झाले होते.

पुढे वाचा