श्री घनश्याम पाटील या तरुण, तडफदार संपादकाच्या लेखणीतून उतरलेल्या निवडक अग्रलेखांचा संग्रह ‘दखलपात्र’ वाचण्यात आला. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा सारा प्रवास खरोखरच वाचनीय नि दखलनीय असाच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. त्याचबरोबर प्रथमदर्शनी असाही प्रश्न पडतो की, संपादक म्हणजे लेखनीस सर्वस्व मानणारा प्राणी असे असताना मुखपृष्ठावर लेखनीला जोडून तलवार का बरे असावी? मात्र पुस्तकाचे अंतरंग उलगडत असताना या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडते.
पुढे वाचाCategory: दखलपात्र
आई – एक महान दैवत
द. गो. शिर्के गुरूजींनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या वाचकप्रिय पुस्तकातील हे एक प्रकरण. मातृभक्तीचा यथोचित गौरव करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. हे पुस्तक घरपोहच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
पुढे वाचादरवळ वाचकांना सुगंधित करणारा
‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांच्या ‘दरवळ’ या नव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी प्रस्तावना लिहिलीय. ही मर्मग्रही प्रस्तावना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.
पुढे वाचाआधुनिक ऋषी म. म. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे
स्तुतिर्नैव यस्मै कदा रोचते च । धनं चा पि तस्मै विषं वै सदा च ॥ सदाचार वृत्तं हि यस्यामृतं च । नमामो वयं तं हि यज्ञेश्वरं च ॥ आजच्या काळात कोणाला ऋषी कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शन करावयाचे असल्यास त्यांनी श्रीचतुर्वेदेश्वरधाम सावरगांव येथे परमादरणीय प्रातःस्मरणीय महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे गुरूजी यांचे दर्शन घ्यावे. अत्यंत तेजःपुज गौरवर्णांकित शरीर, गंभीर मुद्रा, ज्ञान आणि त्याग याचा एकत्रित झालेला समन्वय, नेत्रातील एक वेगळीच चमक, शांत, प्रसन्न, मुखमंडल पाहिले की हे कोणीतरी सत्ययुगातले वसिष्ठ अथवा वामदेवच अवतरले आहेत असा भास मनाला होत असे आणि अत्यंत नास्तिकही…
पुढे वाचामाझे माहेर…!
१९५६-५७ या वर्षामध्ये यवतमाळ येथे काम करीत असतानाच राम शेवाळकर यांच्या मनात नांदेडला जाण्याचा विचार घोळत होता. त्यावेळी पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्राध्यापक पदाची एक जागा रिक्त होती परंतु अचानक यवतमाळ येथील ज्या महाविद्यालयात शेवाळकर प्राचार्य म्हणून काम बघत होते त्या कॉलेजचे संस्थापक बाबाजी दाते यांचा अपघात झाला आणि शेवाळकर यांच्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी असल्यामुळे शेवाळकरांना तो विचार स्थगित ठेवावा लागला.
पुढे वाचाआपण सारे कोरोनाग्रस्त
प्रिय सटू… ते तातू वगैरे आता जुनं झालं. किती वर्षे तीच ती जुनी नावं वापरायची? ओल्ड फॅशन्ड नाही का वाटत! आता बघ, आपल्या पिढीची नावं शिल्लक तरी आहेत का? (आता तुझं नाव सटवा पण मी त्याचा सट्यु केला!) अलीकडचं नाव तर पहा. ती माणसाची असल्यागत वाटतच नाहीत मात्र आपणाला त्याच नावानं बोलावं लागतं ना लेकरांना!
पुढे वाचाहॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी
एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो. 1. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि 2. त्या चित्रपटात आलेल्या विषयवस्तुचे, मांडलेल्या विचार, तत्त्वज्ञानाचे – ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.
पुढे वाचाकुणी देईल का मज त्या दु:खाची भूल?’
“राजा रविवर्म्यानं त्याच्या उर्वशीच्या चित्रासाठी जे मॉडेल वापरलं होतं त्याबद्दल तुला किती म्हणून उत्सुकता होती. रविवर्म्याला त्या मॉडेलच्या शरीराबद्दल आसक्ती होती का? प्रेक्षकाला तशी उर्वशीबद्दल आसक्ती वाटावी अशी रविवर्म्याला अपेक्षा होती का? असली कलाबाह्य चावट उत्सुकता तुला वाटली होती?” प्रा. विजय कारेकर यांचा ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या मार्च 2010 च्या अंकातील हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. अवश्य वाचा. प्रतिक्रिया द्या.
पुढे वाचाया लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव
‘‘आयुष्यात दु:ख येतं ते वळवाच्या पावसासारखं पण सुख मिळतं ते गुलाब पाण्यासारखं’’, ‘‘माणसाला सुखाचं संबंध वर्ष जेवढं शहाणपण शिकवत नाहीत तेव्हढं संकटाचा एक क्षण शिकवून जातं.’’, ‘‘माणसाची इच्छा ही नंदनवनातील कल्पकता नाही तर ती वाळवंटातील हिरवळ आहे’’ ही वाक्यं म्हणजे ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर उपाख्य भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्यसागरातील मोती होत. सुविचारांची रत्ने होत.
पुढे वाचासर्वार्थाने गुरू
विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली.
पुढे वाचा