‘एक वेळ हिमालयासारखा महापर्वत स्थानभ्रष्ट होईल, आकाश कोसळेल, अग्नी शीतल होईल, पाण्यासारखे पदार्थ स्वतःचे गुणधर्म, स्वतःची ओळख सोडतील पण हा भीष्म केलेल्या ब्रह्मचर्य या प्रतिज्ञेचा कधीही भंग होऊ देणार नाही…’ असे ठाम उद्गार आहेत पितामह भीष्माचार्य यांचे. ज्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आणि एखादी उपासना करावी त्याप्रमाणे ते स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले म्हणूनच आज एखाद्याने कोणताही प्रण केला, प्रतिज्ञा केली की आपण त्यास भीष्मप्रतिज्ञा म्हणतो.
पुढे वाचाCategory: दखलपात्र
लातूरचा ऍग्रोसेल
32 वर्षांपूर्वी मार्केट कमिटी कायद्याविरुद्ध केलेला रचनात्मक कायदेभंग साधारण 1998 मध्ये, वर्ष नेमके आठवत नाही. त्या वर्षी आम्ही लातूरला ‘ऍग्रोसेल’ भरवला होता.
पुढे वाचादेणाऱ्याने देत जावे
अनंत काणेकरांचा ‘दोन मेणबत्त्या’ नावाचा लघुनिबंध आम्हाला शाळेत असताना अभ्यासक्रमात होता. या लघुनिबंधातील पुढील वाक्य आयुष्यभर लक्षात राहिलं, ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास’
पुढे वाचाअजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं!
पुढे वाचाखरं तर हीच वेळ!
काळ मोठा कठीण आलेला आहे. सत्वपरीक्षा घेणारा आहे. स्वयंशिस्त लावून घेण्याचा आणि कायमच असं राहण्याचा. खरं तर हीच छान संधी आहे कुटुंबाबरोबर राहण्याची, मी आहे तुमच्यासोबत घाबरू नका हे सांगण्याची. त्यासाठी आपण स्वत: सामाजिक शिस्तीचे पालन करायला हवं. काहीतरी वाचून वा पाहून घाबरून न जाता परिस्थितीला तोंड द्यायला शिकायला हवे. केवळ आलेले मेसेजेस फोरवर्ड करून हे भागणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा हे महत्त्वाचे.
पुढे वाचासच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र
पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती! ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.
पुढे वाचाराज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’
प्रवीण विठ्ठल तरडे हे एक चित्रपट निर्माते आणि अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील गणपतीची सजावट करताना विद्येची देवता असलेल्या गणनायकाला वंदन म्हणून पुस्तकांची आरास करायचे ठरवले. तशी आरास केली आणि ती करताना इतर पुस्तकांबरोबर गणपतीच्या खाली भारतीय संविधानाची प्रत ठेवली. समाजमाध्यमावर त्यांनी या देखाव्याचा फाटो टाकताच अनेकांकडून त्यांना कडवा विरोध सुरू झाला. ते पाहता त्यांनी त्यांची पोस्ट काढून टाकली आणि जाहीर माफी मागितली. विशेषतः ही माफी मागताना ‘आरपीआय, भीम आर्मी, पँथर अशा काही संस्था-संघटनांची नावे घेत त्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर आपण ती सुधारली आणि दुखावल्या गेलेल्या दलित बांधवांची…
पुढे वाचाविद्येच्या देवतेचा वाचनसंदेश
आज गणेश चतुर्थी. ह्या दिवशी आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. त्याच्यापुढे छान आरास करतो. आपल्यातील कलागुणांना वाव देतो! परंतु ह्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ह्या विषाणूमुळे जगभर अगदी हाहा:कार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे जग कसे ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात तर ह्या विषाणूने कहरच केला आहे. गेले पाच-सहा महिने झाले सगळे व्यवहार बंद होते. सगळ्यांच्या अंगात आणि मनात नकारात्मकता भरली आहे. ह्या सगळ्या नकारात्मकतेत गणपती बाप्पाच्या आगमनाने मनाला आता कुठे थोडीशी उभारी आली आहे. सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. त्यात सगळीकडे छान पाऊसही झाला आहे. सगळी धरणे ओसंडून वाहिली आहेत. अर्थात काही…
पुढे वाचाबेरोजगारी कमी होण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा!
देशात व राज्यात कोरोना महामारीमुळे मोठे संकट आले आहे. एकूणच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येकाचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार म्हणून जे काही उपाय योजना करायला पाहिजे त्या सुरु आहेत. काही बाबीकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे वाटते.
पुढे वाचाउगवतीला सलाम!
निवडणुकीचे दिवस होते. एक उमेदवार पंधरा वीस पाठीराख्यांचं मोहोळ घेऊन वॉर्डात प्रचाराला आले. अत्यंत नम्रपणे कमरेत (त्यांच्याच) वाकून प्रत्येकाला बत्तीशी दाखवत नमस्कार करीत होते. तरुणांना मिठी मारत होते. मलाच मत द्या म्हणून लाचार आवाहनही करीत होते. माझ्या ते चांगल्या परिचयाचे होते. मी स्वागताला तयार होतो. शेजारच्या लहान मुलाला कडेवर घेऊन आपुलकी दाखवत होते पण अचानक मला न भेटताच तो लवाजमा पुढे निघून गेला.
पुढे वाचा