असं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा! असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला सांगणारे एक चांगले शिवचरित्रकार आम्हाला मिळाले, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानं विख्यात असलेल्या या शाहीरानं वयाची शंभरी गाठली आणि अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रत्येक श्वासात छत्रपती शिवाजीमहाराज होते. त्यांच्या हृदयातही महाराजच आणि महाराजांचा इतिहासच होता, याबद्दल कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही.
पुढे वाचाCategory: दखलपात्र
शिवप्रताप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
पुढे वाचामाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ
‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ मध्यंतरी हिंदीतील एका मोठ्या साहित्यिकाच्या पुढील ओळी वाचनात आल्या… “आवाज उंची होगी,तो कुछ लोग सुनेंगे! अगर बात उंची होगी,तो बहोत सारे लोग सुनेंगे!” या ओळी लेखक घनश्याम पाटील यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “दरवळ” या पुस्तकासाठी तंतोतंत लागू पडतात. कारण ‘दरवळ’ वाचताना त्यातील प्रत्येक लेखातील प्रत्येक परिच्छेदातून आपल्याला निश्चितच लिखाणातील उंचीचा वेगळेपणा जाणवतो. परिणाम साधणाऱ्या वाक्यांची उंची जाणवते! त्यांनी प्रत्येक लेख अत्यंत पोटतिडिकेनं लिहिलेला आहे याची पदोपदी प्रचीती…
पुढे वाचा१९६० नंतरच्या कवितांची सफर
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2020 साहित्य चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि ‘चपराक’ची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092 कवितेसोबत चालताना…! मराठी कवितेत 1960 नंतरच्या कवितेचं वेगळेपण आहे. खरी सशक्त कविता 1960 नंतर आलेल्या संग्रहांनी मराठीला दिली आहे पण इथं तो इतिहास सांगायचा नाही. त्या कवितेवर समीक्षा करावयाची नाही. आता एकविसाव्या शतकाची दोन दशकं संपून गेल्यावर या कवितांबद्दल लिहिणं हे सिंहावलोकन आहे पण वैयक्तिक माझ्यासाठी हे स्मरणरंजन आहे. कळत्या वयापासून या कवितेची आवड लागली. नंतर स्वत: कविता लिहू लागलो. कवीसंमेलनात भाग घेणं सुरु झालं. हे गेली चाळीस वर्ष सुरु आहे. त्यामुळं…
पुढे वाचादरवळ
मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, हैदराबाद यांच्या ‘पंचधारा’ या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी ‘दरवळ’ या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२
पुढे वाचापाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील
दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा.
पुढे वाचासंपादकीय
एकदा एक भविष्यवाणी झाली. ‘पुढची पंधरा वर्षे जमिनीत काहीच पिकणार नाही…’ ती ऐकून सगळे शेतकरी हवालदिल झाले. सगळ्यांपुढं मोठं प्रश्नचिन्ह! बरं, पंधरा वर्षे म्हणजे कालावधीही थोडाथोडका नव्हता. या वर्षात पिकलंच नाही तर खायचं काय? सगळेच चिंतेत होते. पंधरा वर्षे पिकणार नाही म्हटल्यावर रोज रानात जाण्याची गरज नव्हती. कामही करावं लागणार नव्हतं. पिकणारच नाही तर कष्ट करून काय फायदा? असा साधा-सोपा विचार होता. अशा सगळ्या वातावरणात गावातला रामू मात्र रोज रानात जायचा. त्यानं नांगरणी सुरू केली. त्याआधी रानातलं सगळं तण बाजूला सारलं. त्याचा हा खुळेपणा पाहून सगळे हसू लागले. एकानं विचारलं,…
पुढे वाचा‘शस्त्र’ वापरावं जपून!
“शब्द संभलकर बोलिए, शब्द को हाथ ना पांव। एक शब्द करे भलाई , तो दुजा करे घाव ॥” क्रांतिकारक संत कबीर महाराजांच्या वरील वचनाप्रमाणे शब्द हे किती मोठं प्रभावी ‘शस्त्र’ आहे हे आपण सगळेच अनुभवत असतो. शब्दानं शब्द वाढत गेला की त्याचं पर्यावसान भांडणात होणं हे ठरलेलंच असतं! तसंच सहानुभूती दर्शविणारे आपुलकीचे चार शब्द देखील एखाद्या वाट चुकलेल्या ‘मुसाफिराला’ दिशादर्शक ठरू शकतात!
पुढे वाचाकवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !
‘आईचा मान कधी देवाला नाही’ नमस्कार मंडळी, आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत! त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली’ समर्पित करतो आहे.
पुढे वाचाहैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!
‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…’’ -स्वामी रामानंद तीर्थ)
पुढे वाचा