जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळे छापील स्वरुपात कविता जाणकारांपुढे येण्याचं भाग्य आम्हा कवींना सुरुवातीला लाभलं नाही.
पुढे वाचाCategory: अक्षर ऐवज
तो सुवर्ण योग
मासिक साहित्य चपराक, सप्टेंबर 2018 एका थोर माणसाच्या आणि माझ्या नावात खूप साधर्म्य, ते म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे सर्वेसर्वा अप्पा आणि मी पण अप्पा!
पुढे वाचाचिंता करितो विश्वाची…
मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2019 सज्जनगड… सोळाव्या शतकापासून ते आजतागायत प्रभू श्रीरामाच्या उपासनेत आकंठ बुडालेला हा गिरीदुर्ग. इथल्या प्रत्येक दगडात समर्थांचा आजही वास आहे. जगद्उद्धारासाठी स्वतः परमेश्वर जेव्हा भूतलावर वास्तव्य करु शकत नाही तेव्हा त्याची विचारधारा घेऊन प्रत्येक वेळी अशा विभूतींनी जन्म घेतला आहे, ज्यांनी समाज घडवला.
पुढे वाचाप्राक्तन – प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है… हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता.
पुढे वाचाअपराध
कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही. कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार. अभ्यासात, खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवाने सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळ करंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक.
पुढे वाचादखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह
माझ्या ‘दखलपात्र’ या अग्रलेख संग्रहाच्या दोन आवृत्या संपल्या. अनेक वाचक या पुस्तकांवर अजूनही अभिप्राय कळवतात. या पुस्तकानं मला अनेकांच्या मनात आणि हृदयात स्थान दिलं. आज दैनिक ‘पुण्य नगरी’च्या ‘मी आणि माझं वाचन’ या सदरात ज्येष्ठ लेखक श्री. दिलीप देशपांडे यांनी ‘दखलपात्र’विषयी लिहिले आहे. दिलीप देशपांडे सर, ‘पुण्य नगरी’चे संपादक श्रीकांत साबळे सर आणि पुरवणी संयोजक स्वप्नील कुलकर्णी यांचे आभार!
पुढे वाचाशब्दाविना बरेच काही…
शब्द हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रेम, माया, विश्वास, सुख, दु:ख, राग, आनंद, वैताग, विचार या मनातील भावना पुढच्या व्यक्तिपर्यंत बर्याचदा शब्दांच्या मार्फत पोहोचवल्या जातात. लेखक, कवी, विचारवंत, वक्ता यांचे तर शब्द हेच सामर्थ्य आहे. विश्व, ब्रह्म आहे तरीही प्रत्येक जण बोलत असतोच की शब्दाविनाही बरेच काही!
पुढे वाचारंग जीवनाचे!
रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. ढोबळ मानाने रंग दोनात विभागावे वाटतात.
पुढे वाचासु(संवाद)…
‘‘ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!’’ ‘‘जरा म्हणून अक्कल नाही…’’ ‘‘ये म्हातार्या जरा ऐक की…’’ ‘‘चल हो बाहेर, सगळी वाट लावली…’’
पुढे वाचापायी वारीचा इतिहास
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात.
पुढे वाचा