अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!

प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ अभ्यासच आहे असे नाही तर ते जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून या महामानवांच्या विचारांचा प्रसार करतात. म्हणूनच त्यांची निवड…

पुढे वाचा

सक्षम भारतीय महिला

सक्षम भारतीय महिला

एक आदर्श सोसायटी म्हणून नावाजलेल्या आमच्या सोसायटीमध्ये काही चांगल्या प्रथा आम्ही सुरुवातीपासूनच अमलात आणल्या आहेत. त्यामध्ये श्री दत्त जयंती, श्री गणेशोत्सव, दहीहंडी, कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमा वगैरे सण उत्सव आम्ही सार्वजनिकरित्या साजरे करतो. ज्यायोगे आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगतो!

पुढे वाचा

धीर धरा रे…

धीर धरा रे...

तुम्ही बसने ऑफिसला निघाला आहात, रस्त्याने नेहमीप्रमाणे गर्दीचा महापूर ओसंडून वाहत आहे. नेमका चौकातला सिग्नल बंद पडला आहे. बसच्या दोन्ही बाजूने सायकल्स, बाईक्स, टेम्पो, रिक्षा पुढे पुढे घुसत होत्या. त्यातच एक ट्रक विरुध्द दिशेने घुसला आणि सर्व बाजुनी वाहतुकीची कोंडी झाली. कुणालाही थांबायला वेळ नाहीये. प्रत्येकाला पुढे जायची घाई आहे. या प्रकारामुळे वाहतुक पूर्ण थांबली आहे. बसमधील प्रवासी अगतिकपणे आजूबाजूला चाललेला गोंगाट व हॉर्नचे कर्कश आवाज सहन करत आहेत. कुणीही आपले वाहन मागे घ्यायला तयार नाही. तुम्ही हताश होऊन फक्त बघत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.

पुढे वाचा

समर्पण…

समर्पण...

एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, “महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?” ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, “अगं आतून जरा कंदील घेऊन ये.”

पुढे वाचा

रामफळ

रामफळ

बदली झाली तसे पुन्हा जुन्या शाळेत म्हणजे शाळेच्या गावाला जायला जमलेच नाही. जाण्याचे कारणही नव्हते. दोन्ही गावे तालुक्याच्या दोन विरूध्द टोकाला. अचानक एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. मूलं मला पाहून लपून बसायची. हळूच डोकावून पाहायची. नजरानजर झाली की खुदकन हसायची. दोष त्यांचा नव्हताच. हे होणारच होतं.जवळपास वर्षाने मी गावात जात होतो. खरं सांगायचं तर मीच थोडासा बुजलो होतो. वास्तविक कितीही जवळच्या नात्यामध्ये संपर्काचा खंड पडला की असं होतंच असतं-.

पुढे वाचा

अन मी पोरका झालो

अन मी पोरका झालो

२२ मार्च २०२०, रात्रीचे दहा वाजले होते, नुकतीच आमची जेवणे उरकली होती. मी आणि बायको वंदना दूरदर्शनवरील बातम्या बघत बसलो होतो. कोरोना विषाणूचा जगभर जोमाने पसरत चाललेला प्रादुर्भाव व त्या संदर्भातील बातम्या ऐकून थोडेसे धास्तावल्या सारखे झाले होते. कालच जनता कर्फ्यू होऊन गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे जरासे चिंतेचेच वातावरण पसरलेले होते.

पुढे वाचा

रंदागुली इमला

रंदागुली इमला

मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत.

पुढे वाचा

तुम्हाला नकार देणे जमते का?

तुम्हाला नकार देणे जमते का?

“माझं थोडं ऐकता का श्यामराव? मला थोडे पैसे पाहिजे होते. आपल्या कंपनीच्या फंडातून मिळाले की लगेच परत करणार तुम्हाला! बघा नाही म्हणू नका, एक महत्त्वाचं काम निघालं वेळेवर म्हणून गरज भासली पैशांची!”

पुढे वाचा

प्रस्तावना – ‘थोडं मनातलं’

विनोद श्रा. पंचभाई लिखित ‘थोडं मनातलं’ या पुस्तकाला ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या shop.chaprak.com या ऑनलाईन शॉपीमधून भारतात कुठेही घरपोच मागवू शकाल.

पुढे वाचा

आयपांढरीतल्या माणसांचा कानोसा

आयपांढरीतल्या माणसांचा कानोसा

‘चपराक प्रकाशन’च्या या आणि इतरही पुस्तकासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. पुस्तकासाठी संपर्क – 87679 41850 श्री. सुधाकर कवडे यांच्या ‘आयपांढरीतील माणसं’ चैतन्यदायी, प्रेरणादायी आहेत. मराठी साहित्याच्या विश्‍वात दमदार पाऊल टाकणारा, नवा उमेदीचा व अस्सल मराठमोळ्या मातीतल्या नात्यांची वीण घट्ट करणारा, शब्दांवर प्रेम करणारा, माणसांतलं वेगळंपण जपणारा आणि आपल्या शब्द सामर्थ्यानं सामान्य माणसाच्या जगण्याला असामान्य उंचीवर बसवण्याची किमया, विद्यादेवतेचा वरदहस्त लाभलेले नवोदित लेखक सुधाकर कवडे यांनी काळजांत जपलेली माणसं शब्दबद्ध केली आहेत.

पुढे वाचा