जागो मोहन प्यारे!

जागो मोहन प्यारे!

“एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. “महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन ‘सरकारी अधिकारी’ अशी बतावणी केली की ‘पॉश’ दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो.”

पुढे वाचा

जगबुडी माया

जगबुडी माया

सुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही शिळा कोणी तयार केली याचा संशोधकांनी तेव्हापासून आत्तापर्यंत शोध घेतला पण काहीही हाती लागले नाही. बहुदा स्पॅनिश समुद्रडाकूंनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केले व त्याची सर्व संपत्ती खरवल्यासारखी लुटून नेली.

पुढे वाचा

तेवीं जालेनि सुखलेशें

तेवीं जालेनि सुखलेशें

सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली.

पुढे वाचा

समईच्या शुभ्रकळ्या

समईच्या शुभ्रकळ्या

सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्‍वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

पुढे वाचा

रामची आई!

रामची आई!

राम शेवाळकर यांना त्यांच्या आईची आठवण येताच गहिवरून यायचे. गोपिकाबाई हे त्यांच्या आईचे नाव. मात्र तिच्या बाबतीत ते वयाच्या अडीच वर्षापासून दुरावले होते. एखाद्या अपत्यास जन्मत:च एखादा अवयव नसावा आणि त्याला त्या अपंगत्वाची सवय व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आईचे नाते होते.

पुढे वाचा

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

नुकताच पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा केला. विद्यार्थ्याला घडवण्याचं, शिक्षण देण्याचं, साक्षर करण्याचं, संस्कार करण्याचं काम शिक्षक अगदी मनापासून जीव तोडून करत असतात. तन, मन, धन खर्च करून राबत असतात. या शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण ‘शिक्षक दिन’ साजरा करतो! पण लोकाना साक्षर करण्याचे काम फक्त शिक्षकांचे आहे का? फ़क्त सरकारचेच आहे का? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.

पुढे वाचा

संवेदनशील माणसांमुळे जगलो !

संवेदनशील माणसांमुळे जगलो !

आजी-आजोबा दूर जाताना दिसतात. स्वत:च्या विचारात गढलेले दिसतात. शरीरस्वास्थ्य नसते. भावना गेलेल्या असतात, आशा जिवंत असते. उघडय़ा डोळ्यांनी सारं पाहायचं असतं. नजरेतला धाक आता संपलेला असतो. सहनशक्तीसुद्धा थुंकीसारखी गिळावी लागते कारण इथे यांची बडबड ऐकायला कुणालाच वेळ नाही. “तुम्ही गप्प बसा, मिळेल ते जेवा आणि पडून राहा” असं ऐकायची वेळ येते आणि आपण मुलांचे आश्रित असल्याची जाणीव होते.

पुढे वाचा

“अहंकाराचा वारा….”

"अहंकाराचा वारा...."

माझ्या मराठवाड्यातल्या नरसीचे श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा एक अभंग कालपरवा वाचनात आला. ‘अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णूदासा | भाविकांसी |’ असा त्या अभंगातला एक चरण. या ओळी नकळतच कानातून मनात शिरल्या अन् विचारांची एक शृंखला अगदी माझ्या नकळतच मनातल्या मनात जोडली जाऊ लागली.

पुढे वाचा

जयाचे आत्मतोषी मन राहे

जयाचे आत्मतोषी मन राहे

“सर उद्या सुट्टी आहे का?” पिंकी म्हणाली. “हो, उद्या जन्माष्टमीची सुट्टी आहे. शाळा भरणार नाही.” शाळेचा दरवाजा बंद करत मी म्हणालो. “नको ना सर उद्या सुट्टी. या ना तुम्ही. आपण दहीहंडी करू.” धीरज म्हणाला. “अरे, आपल्याकडे साहित्य नाही. तुमच्यासाठी खास ड्रेस नाहीत. कसली दहीहंडी? त्याच्यापेक्षा सुट्टी घेऊया.” असं बोलून मी गाडीकडे निघालो. तेवढ्यात किरण म्हणाला,” तुम्ही फक्त या. आपण करू बरोबर.”

पुढे वाचा