सुकाणू समिती नको; एकहाती नेतृत्व हवे!

ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना पारंपरिक शेतीपद्धती सोडून आधुनिक पदद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे आता शेतकरी लढ्याच्या रणनीतीतही बदल करणे अपरिहार्य झाले आहे. कारण वर्षानुवर्षे त्याच त्याच पद्धतीचे आंदोलन, त्याच त्या मागण्यांचा फार्स, प्रतिवर्षी तोच तो लढा आणि त्यातील तीच ती नाटकी स्वरुपाची भाषणे आता शेतकरी नेत्यांनी बंद करायला हवीत. तसेच शेतकर्‍यांनी ती ऐकणेही बंद करायला हवीत. ज्याप्रमाणे एक मेंढरु दुसर्‍याच्या पाठीमागे जाते आणि पुढे जाऊन ते खड्ड्यात पडते अगदी तशाच पद्धतीने शेतकरी चळवळीतील लढ्याचे आणि नेतृत्वाबाबत झाले आहे. आता कुठेतरी यात बदल व्हायला हवेत. अन्यथा पुन्हा एकदा पदरी निराशाच पडल्याशिवाय…

पुढे वाचा