खडतर प्रवासाची प्रेरक कथा

अवघ्या एका रूपयांसाठी तुंबलेली गटारं साफ करणं, उकिरडे तोडणं, शेतमजुरी करणं, दारूच्या दुकानात काम करणं, शिक्षणासाठी मित्राच्या रूममध्ये रहायला मिळावं म्हणून धुणी-भांडी, स्वयंपाक करणं, पायात शूज नाहीत म्हणून अनवाणी पळणं, मेडिकल टेस्ट करण्यासाठी पैसे नसल्यानं भाजी मंडईत हमाली करणं हे सगळं खरंच सोपं नसतं. हे सगळं का करायचं? तर आयुष्याची दिशा ठरली होती की काहीही झालं तरी भारतीय सैन्य दलात सहभागी होऊन देशाची सेवा करायची… भारतीय सेनेतील जवान ते कर्नल या अधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाचा यशस्वी संघर्ष यापेक्षा सर्वश्रेष्ठ साहित्य ते कोणते? म्हणूनच…

पुढे वाचा

स्त्री-पुरूष मैत्री – आकर्षण, गरज की फॅशन?

‘सौहृदान सर्वभूतानां विश्वासो नाम जायते।’ मैत्रीमुळे सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांविषयी विश्वास निर्माण होतो, असे मैत्रीविषयी म्हटले गेले असले तरी मैत्री या शब्दाची, त्यातील गर्भित भावनेची व्यापकता खूप मोठी आहे. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. जन्मताच त्याला अनेक नाती मिळतात पण मैत्री हे असे नाते असते की ते त्याने स्वतः निर्माण केलेले असते.

पुढे वाचा