साहेब निर्मितीचे कारखाने

छोटे छोटे साहेब ते मोठे मोठे साहेब अशी एक साहेबयात्रा वर्षानुवर्षे सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही! नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद! झिंदाबाद!’ घोषणा देत राहणं हीच आपली आयुष्य घडवणारी सोपी पायवाट आहे असं मानणारा, लाचारीच्या सातत्याने बाह्यसुखालाच यशस्वी आयुष्य मानणारा महाप्रचंड जमाव, अगतिक करणार्‍या गुलामीच्या भक्तिभावाने नवे नवे आपले साहेब निर्माण करत असतो.  घराबाहेर पडलो, भल्या सकाळीच. जरा बर्‍या हवेत फिरायला म्हणून! पण काल रात्री जे नव्हतं ते अचानक घराबाहेरच्या चौकात प्रकटलं होतं. ते होतं महाप्रचंड पोस्टर. अगदी नुकतंच मिसरूड गर्द होत चाललेल्या तरूणाचा चेहरा…

पुढे वाचा