सारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व 

काश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारताचे नंदनवन संबोधल्या जाणार्‍या या राज्याविषयी बालपणापासूनच भलतंच कुतूहल आणि आकर्षण वाटायचं. हिमशिखरांनी वेढलेल्या पर्वतराजी, डोंगरावरून वाहणार्‍या खळाळत्या नद्या, सूचिपर्णी वृक्षांची दाट झाडी, मनोहारी फुलांनी बहरलेले विस्तीर्ण बगीचे, तलाव, विहरणारे शिकारे, हाऊसबोट, सफरचंदांनी लगडलेल्या बागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा या नंदनवनात राहणारे आमचे काश्मिरी बांधव! जन्माला आल्यावर एकदा तरी ह्या नंदनवनाला आवर्जून भेट द्यावी असे वाटायचे. आजवर कधीही काश्मीरबद्दल आकर्षण तर कमी झालं नाहीच पण धुमसत्या काश्मीरबद्दल ऐकल्यावर मात्र वाटलं, ‘हाच का तो आपला स्वर्ग? आपलं नंदनवन? कोणाची नजर तर लागली नाही…

पुढे वाचा